दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे राष्ट्रकुल २०१८ स्पर्धांमधील भारतीय खेळाडूंच्या चमकदार कामगिरीबद्दल. आज नेमबाजी, कुस्ती आणि बॉक्सिंगचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला असेच म्हणावे लागेल. तर दुसरी महत्वाची बातमी राज्यातील प्लास्टिकबंदीबद्दल कोर्टाने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाने प्लास्टिक उत्पादकांना थोडा दिलासा मिळाला आहे. तिसरी महत्वाची बातमी देशभरात गाजत असलेल्या कटुआ बलात्कारप्रकरणासंदर्भात दिवसभरात काय काय घडले यासंदर्भातील आहे. चौथी महत्वाची बातमी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांबद्दल असून कच्चा लिंबू या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…