21 March 2019

News Flash

FB बुलेटीन: नाणारविरोधात मनसे आक्रमक, बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असीमानंद निर्दोष व अन्य बातम्या

FB बुलेटीन

FB बुलेटीन

दिवसभरातील महत्वाच्या बातम्यांपैकी पहिली बातमी आहे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबईत नाणार प्रकल्पाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तर दुसरी महत्वाची बातमी राष्ट्रीय स्तरावरील आहे. हैदराबादमधील मक्का मशिदीत १८ मे २००७ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यात स्वामी असीमानंदसह पाच आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. दुसरी महत्वाची बातमी कठुआ बलात्कार प्रकरणी आजपासून खटला सुरु झाला आहे त्यासंदर्भातील आहे. सुप्रीम कोर्टाने खटल्याच्या पहिल्याच दिवशी पीडितेचे कुटुंबीय आणि वकिलाला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तर तिसरी महत्वाची बातमी आहे यंदाच्या मान्सूनबद्दलची. यंदाच्या वर्षी देशभरात सरासरी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…

First Published on April 16, 2018 5:40 pm

Web Title: facebook live bulletin of 16th april 2018