दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील. नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचचे समर्थन केले आहे. सरोज खान यांच्या या मतामुळे नवीन वाद होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. तर दुसरी महत्वाची बातमी राजकारणातील आहे. काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी फक्त सिनेसृष्टीतच नाही तर संसदेतही कास्टिंग काऊच होते असा धक्कादायक दावा केला आहे. त्याचबरोबर आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे तसेच आजच अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित संजू या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…