दिवसातील पहिली महत्वाची बातमी आहे पुण्यामधील एका विचित्र अपघाताबद्दल. पुण्यातील सांगवी परिसरातील फेमस चौकात झालेल्या अपघातामध्ये कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलात घुसून एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरी महत्वाची बातमी आहे गुजरातच्या उना येथे गोरक्षक पीडित दलितांच्या एका समुहाने रविवारी हिंदू धर्माचा त्याग केला त्याबद्दलची. दोन वर्षांपूर्वी झालेल्या उना दलित अत्याचार प्रकरणातील एका कुटुंबासोबत जवळपास ३०० ते ३५० दलितांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या बातम्यांबरोबरच देश, विदेश, मनोरंजन, क्रिडा क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला हा धावता आढावा लोकसत्ता ऑनलाइनच्या टी टाइम बुलेटनमध्ये…