News Flash

फेसबुकचे नवे ‘सर्च टूल’

सोशल नेटवर्कींगच्या जालात अग्रेसर असलेले फेसबुक आपले नवे वैशिष्ट्यपूर्ण 'सर्च टूल' लवकरच सुरू करणार आहे. या सर्च टूलच्या मदतीने फेसबुकच्या सध्याच्या सर्च टूलच्या क्षमतेत वाढ

| July 9, 2013 12:50 pm

सोशल नेटवर्कींगच्या जालात अग्रेसर असलेले फेसबुक आपले नवे वैशिष्ट्यपूर्ण ‘सर्च टूल’ लवकरच सुरू करणार आहे. या सर्च टूलच्या मदतीने फेसबुकच्या सध्याच्या सर्च टूलच्या क्षमतेत वाढ होणार आहे. त्यामुळे फेसबुकवर इतरांचे पेज शोधणे, छायाचित्र शोधणे, एकादे ठीकाण शोधणे अधिक सोपे होणार आहे.
फेसबुकने हे सर्च टूल जानेवारी महिन्यातच सुरु केले आहे. परंतु, याची प्राथमिक चाचणी करण्यासाठी लघुतत्वावर हे टूल सुरू करण्यात आले आहे. अजूनही ते सर्वांसाठी वापरण्यास खुले करण्यात आलेले नाही. त्यानुसार फेसबुकच्या अभियंत्यांची चाचणी सुरू आहे. पुढील काही आठवड्यात हे नवे सोशल ‘सर्च टूल’ फेसबुक धारकांना वापरता येईल. या ‘सर्च टूल’ला ‘ग्राफ सर्च’ असे नाव देण्यात आले असल्याचेही समजते.
यामार्फत जगभरातील फेसबुक धारकांच्या पेजचा शोध त्वरित घेता येणे शक्य होणार आहे. तसेच यात आपली अधिक माहिती देणाऱया वैशिष्ट्याचाही  समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2013 12:50 pm

Web Title: facebook pushes search feature to more users
Next Stories
1 हृदयविकाराचा झटका आलेल्या भारतीयाला पाकिस्तानची मदत
2 दिग्विजय यांचे आरोप निराधार असल्याचा भाजपचा दावा
3 सीबीआय अधिकारी माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर?
Just Now!
X