वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्या नाझींच्या प्रतीकचिन्हासह केलेल्या प्रचाराच्या जाहिराती फेसबुकने काढून टाकल्या आहेत त्यात उलटा लाल त्रिकोण वापरण्यात आल्याचे समजते.

नाझींनी त्यांचे राजकीय विरोधक व इतरांना छळ छावणीत टाकून मारले होते. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर समितीपुढे साक्ष देताना गुरुवारी सांगितले की, द्वेषमूलक विचारसरणीच्या प्रतीकचिन्हांना स्थान नाही. त्या चिन्हासोबत जर काही स्पष्टीकरण व त्या चिन्हांविरोधात निषेधात्मक मजकूर असेल तरच त्यांना आम्ही परवानगी देऊ शकतो. आम्ही अशी चिन्हे आमच्या मंचावर खपवून घेणार नाही व ती काढली जातील. ट्रम्प व पेन्स यांनी वापरलेली चिन्हे आक्षेपार्ह व द्वेषमूलक असल्यानेच काढून टाकली असे या कंपनीचे सुरक्षा धोरण प्रमुख नॅथॅनियल ग्लेशर यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारात १० हजार डॉलर्सच्या जाहिराती केल्या होत्या.