फेसबुकवर आता तुम्हाला एखाद्या मजकूर किंवा छायाचित्रावर नापसंतीची मोहोर उमटवता येणार असून त्यात डिसलाइकचा पर्याय उपलब्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे तुमच्या पोस्टवर भावना व्यक्त करण्याचा पर्याय फेसबुककरांना मिळणार आहे,पण डाऊनव्होट करता येणार नाही. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे. कॅलिफोर्निया येथे कंपनीच्या टाऊनहॉल बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी त्यांनी सांगितले की, डिसलाईक पर्याय देत असलो तरी त्यामुळे डाऊनव्होट करता येणार नाही तर फक्त तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही हे सांगता येणार आहे. थोडक्यात, यापुढे आपल्याला पोस्ट टाकताना त्यावर काय प्रतिक्रिया येतील, याचा विचार करावा लागणार आहे.
लोकांनी डिसलाइक या नापसंतीच्या पर्यायाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती व हे सुरू करण्याविषयीची तयारी सुरू झाली आहे हे सांगताना आपल्याला आनंद वाटतो, असे झकरबर्ग यांनी म्हटले आहे. झकरबर्ग यांनी सांगितले, की रेडिटची जी पद्धत आहे, त्यामुळे अपव्होटिंग व डाऊनव्होटिंग या दोन प्रकारांना उत्तेजन मिळाले, त्यामुळे आपण डिसलाइकची सुविधा देत नव्हतो, यात फक्त तुमच्या भावना व्यक्त करणे एवढाच हेतू साध्य व्हावा कारण आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण काही चांगला क्षण असतोच असे नाही. आता आम्ही फेसबुकवर डिसलाइक पर्याय देत आहोत, त्याचा वापर करता येईल. वापरकर्त्यांच्या टाइमलाइनवर मोमेंट्स सारख्या सकारात्मक सुविधा आम्ही दिल्या. पहिल्यापासून आमचा दृष्टिकोन सकारात्मक राहिला आहे. फेसबुकवर अनेक प्रकाशने काही ना काही पोस्ट टाकीत असतात, त्यामुळे डिसलाइक या सुविधेचे महत्त्व खूप असणार आहे.