भारतातील अब्जाधीशांची यादी जेव्हा फोर्ब्स मासिक जाहीर करते तेव्हा आपल्याकडे कोणाचा कितवा नंबर लागतो हे जाणून घेण्याची उत्सुकता असतेच. आताही असेच एक सर्वेक्षण जाहीर झाले आहे. जगभरातल्या नावाजलेल्या कंपन्यांच्या मालकांचे किंवा त्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांचे पगार किती? याचे उत्तर देणारे सर्वेक्षण करण्यात आले आहे
‘जीएआय रेटिंग’ नावाच्या सर्वेक्षण कंपनीने ही यादी तयार केली आहे. आपण ज्या फेसबुकवर तासनतास रेंगाळत असतो..त्याचा संस्थापक मार्क झुकरबर्गला त्याच्या फेसबुक कंपनीने २०१२ साली तब्बल एका वर्षात २.३ अब्ज डॉलर्स एवढा पगार दिला आहे. यावरून झुकरबर्ग अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणारा मुख्य कार्यकारी अधिकारी ठरला आहे. तर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त पगार घेणारे या यादीत दोन ‘सीईओ’ आहेत. त्यापैकी फेसबुकचा झुकरबर्ग एक.
किशोरवयीनांना फेसबुकवर खुले मैदान!
दुसऱ्या स्थानावर आहेत किंडर मॉर्गन या उर्जा कंपनीचे सीईओ रिचर्ड किंडर.त्यांचे गेल्या वर्षभरातील पगार आणि कंपनीने दिलेल्या इतर भत्त्यांमधून मिळालेले उत्पन्न होते तब्बल १.१ अब्ज डॉलर्स.. रिचर्ड किंडर याची वार्षिक कमाई ही मार्क झुकरबर्गच्या एकूण वार्षिक कमाईपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी आहे.
‘जीएमआय रेटिंग’ या सर्वे कंपनीने उत्तर अमेरिकेतील शेअर बाजारात नोंदणी झालेल्या २२०० कंपन्यांच्या सीईओंना मिळणाऱ्या पगाराच्या आकडेवारीतून ही माहिती जमवण्यात आली आहे.
..तरी एफबी लाइक्स