News Flash

FACT CHECK : मोदी-मोदी घोषणांनी पाकिस्तानची संसद दणाणली.. काय आहे सत्य?

जाणून घ्या नेमक्या काय देण्यात आल्या होत्या घोषणा

पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं वृत्त गुरुवारी काही प्रसारमाध्यमांनी चालवलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फ्रेंच उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातल बोलत होते तेव्हा बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या असंही या वृत्तात सांगण्यात आलं होतं. मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं आहे असं काहीही पाकिस्तानच्या संसेदत घडलेलं नाही. इंडिया टीव्हीने हे वृत्त दिलं होतं. मात्र ते वृत्त संपूर्णपणे चुकीचं आहे.  नेमकं काय आहे या व्हिडीओमागचं सत्य नेमकं काय घडलं? ते आम्ही आता तुम्हाला या बातमीत सांगतो आहोत.

काय आहे सत्य?

पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदीचे नारे नाही तर व्होटिंग व्होटिंग अशा घोषणा देण्यात येत होत्या. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री हे जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा काही खासदारांनी व्होटिंग व्होटिंगच्या घोषणा दिल्या होत्या. मात्र इंडिया टीव्हीने आणि इतर काही प्रसारमाध्यमांनी हे नारे मोदी मोदी असे असल्याचे दाखवत चुकीचे वृत्त दिले. यूट्युबवर पब्लिक टीव्ही नावाचं चॅनल आहे त्यामध्ये पाहिल्यास हे लक्षात येतं की जी नारेबाजी पाकिस्तानच्या संसदेत करण्यात आली ती नारेबाजी मोदी मोदी अशी नव्हती तर व्होटिंग व्होटिंग अशी होती.

पाहा इंडिया टिव्हीचा व्हिडीओ

पब्लिक टीव्हीच्या व्हिडीओत १३ मिनिटं २६ सेकंदाला व्होटिंग व्होटिंग या घोषणा स्पष्टपणे ऐकू येत आहेत. त्यावर असंही सांगण्यात आलं आहे की हो व्होटिंग घेण्यात येईल. तरीही इंडिया टीव्हीने आणि इतर प्रसारमाध्यमांनी या घोषणा मोदी-मोदी आहेत असं सांगत चुकीचं वृत्त प्रसारित केलं. १३ मिनिट ४५ व्या सेकंदाला पाकिस्तानचे लोकसभा स्पीकर म्हणत आहेत की व्होटिंगची मागणी करता आहात ते होईल पण घोषणाबाजी करुन काय होणार आहे?

पाहा पब्लिक टीव्हीचा व्हिडीओ

दरम्यान इंडिया टीव्हीने हे वृत्त दिल्यानंतर डॉ. हर्षवर्धन सिंह, अर्जुन सिंह, अनिल शर्मा, वरुण पुरी, संगीता कुमारी, इंदु तिवारी, तजिंदर पाल सिंह बग्गा अशा भाजपाच्या बड्या नेत्यांनीही पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी या घोषणा दिल्या गेल्याचा इंडिया टीव्हीच्या कथित वृत्ताचा व्हिडीओ ट्विट केला होता. मात्र प्रत्यक्षात या घोषणा व्होटिंग व्होटिंग अशा होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 7:36 pm

Web Title: fact check were modi modi chants raised in the pakistan parliament do you know what is the truth scj 81
Next Stories
1 आत्मनिर्भर भारत: अंतर्गत चॅटसाठी लष्कराने बनवलं साई अ‍ॅप
2 MI vs RCB सामन्यावर लावला जात होता सट्टा, पोलीस कारवाईत तिघांना अटक
3 कांदा बियाणे निर्यातीवर तात्काळ बंदी; केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा
Just Now!
X