रशियामध्ये झालेल्या निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाच पुन्हा एकदा विजय झाला आहे. पुतिन यांनी विरोधकांना हरवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हुकुमशाह म्हणून ओळख असलेल्या पुतिन यांची कार्यशैली आणि नेतृत्व याला रशियातील जनतेने कौल दिला आहे. रशियासारख्या देशाचे अध्यक्ष असलेले पुनित अष्टपैतु व्यक्तिमत्त्व आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. साहसी आणि इतर अनेक गोष्टींचा छंद असलेल्या पुतिन यांच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून घ्यायलाच हव्यात…पाहूयात पुतिन यांच्या विशेष आवडी

१. पुतिन ज्युडोचे 5 th dan ब्लॅकबेल्ट आहेत, तर कराटेचे 8 th dan ब्लॅकबेल्ट आहेत. याबरोबरच ते तायक्वांदोचेही 9th Dan ब्लॅकबेल्ट असून ही तायक्वांदोमधील सर्वात वरची रँक आहे.

२. पुतिन यांना पाळीव कुत्र्यांची विशेष आवड आहे. आपल्या कुत्र्याचे नामकरण करण्यासाठी त्यांनी रशियामधील नागरिकांची स्पर्धा घेतली. त्यातून निवडण्यात आलेले बफी हे नाव त्यांनी आपल्या बल्गेरियन शेफर्ड कुत्र्याला दिले. त्यांच्याकडे असणाऱ्या पाळीव प्राण्यांपैकी अनेक प्राणी त्यांना भेट म्हणून मिळाले आहेत.

३. रशियन भाषेशिवाय पुतिन यांना जर्मन भाषा येते. ही भाषा ते अतिशय चांगल्या पद्धतीने बोलूही शकतात. जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मार्केल रशियाला आल्या असताना त्यांनी इंटरप्रीटर म्हणून कामही पाहिले. ते इंग्रजीचा वापर फारच कम करतात.

४. टाइम मासिकाच्या कव्हरवर पुतिन यांचे छायाचित्र घेण्यात आले होते. या छायाचित्राला २००८ चा सर्वोत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळाला होता. प्रसिद्ध छायाचित्रकार प्लॅटोन याने हा फोटो काढला होता.

५. देशातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पुतिन विशेष प्रयत्न करतात. कार रेसिंगची त्यांना विशेष आवड असून या खेळाचा विकास व्हावा यादृष्टीने ते अनेक प्रयत्न करतात.

६. पुतिन यांच्याकडे असलेले सर्वात महागडे घड्याळ ५ लाख डॉलर किंमतीचे आहे. १८ कॅरेटच्या सोन्यामध्ये हे घड्याळ असून त्याचे डायल चांदीचे आहे. त्यांच्याकडे अशी एकाहून एक किंमती घड्याळ्यांचे कलेक्शन आहे.

७. पुतिन हे पियानोही अतिशय उत्तम पद्धतीने वाजवतात. सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या एका चॅरीटी शो दरम्यान त्यांनी पियानो वाजवला होता.

८. अग्निशामक दलाचे विमान चालवून अपघाताच्या वेळी त्यांनी आपल्यातील हे कौशल्यही दाखवून दिले होते. यावेळी आग लागलेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या विमानातून सोडलेल्या पाण्याचे फोटो नंतर टीव्ही चॅनेलवर आले होते.

९. पुतिन यांच्यावर आधारित असलेले सुपर पुतिन हे वेबकॉमिक मोठ्या प्रमाणात गाजले होते. या कॉमिकमुळे त्यांची सुपरहीरो अशी ओळख निर्माण झाली.

१०. पुतिन यांनी राज्याच्या सुरक्षा दलामध्ये १६ वर्ष अधिकारी पदावर काम केले आहे. पूर्व जर्मनीतील पोलिस दलाच्या गुप्तहेर यंत्रणेत त्यांनी १९७५ पासून १९९१ पर्यंत काम केले.