प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. रिलेशनशिपमध्ये असताना जोडीदार दुसऱ्या शहरात किंवा परदेशात निघून गेला, तर त्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. पण काही जोडप्यांमध्ये प्रेमाचे बंध इतके दृढ जुळलेले असतात की, जोडीदार साता समुद्रापार गेल्यानंतरही, त्यांचे प्रेमाचे नाते कायम टिकून राहते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आतापर्यंत अनेक जोडप्यांनी प्रेमविवाहाला कुटुंबीय किंवा नातलगांचा विरोध असल्यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. आता आत्महत्येचं असचं एक वेगळं प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मुलीने भारतात तर प्रियकराने दुबईमध्ये आत्महत्या केली. आई-वडिलांनी प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे मुलीने तेलंगणधील आपल्या गावच्या घरी जीवन संपवलं तर मुलाने दुबईत आत्महत्या केली.

आणखी वाचा- “सतयुगात पुन्हा जन्माला येतील…” शाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या दांपत्याकडून पोटच्या मुलींचा नरबळी

मनिषा असे मृत तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वत:चे जीवन संपवलं. प्रेयसीच्या मृत्यूबद्दल समजल्यानंतर राकेशने सुद्धा आत्महत्या केली. तो दुबईमध्ये होता. राकेश आणि मनिषाला लग्न करायचे होते, पण त्यांच्या आई-वडिलांचा या नात्याला विरोध होता.

आणखी वाचा- धक्कादायक! एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

आत्महत्या करण्याआधी राकेशने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तो रडताना दिसतो. मनिषा शिवाय मी आयुष्याचा विचार करु शकत नाही असे सुद्धा त्याने म्हटले. नोकरीसाठी म्हणून राकेश अलीकडेच दुबईला गेला होता. आई-वडिलांनी आशीर्वाद द्यावा, यासाठी दोघांनी भरपूर प्रयत्न केले. पालक ऐकत नसल्याने अखेर मनिषाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं तर राकेशने दुबईमधील घरात आत्महत्या केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Family opposed to love marriage woman kills self in telangana man commits suicide in dubai dmp
First published on: 25-01-2021 at 14:44 IST