News Flash

प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकार डेव्हिड फ्रोस्ट यांचे निधन

इंग्लंडमधील ज्येष्ठ पत्रकार आणि सादरकर्ते डेव्हिड फ्रोस्ट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

| September 2, 2013 01:03 am

इंग्लंडमधील ज्येष्ठ पत्रकार आणि सादरकर्ते डेव्हिड फ्रोस्ट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४  वर्षांचे होते. शनिवारी रात्री क्विन एलिझाबेथ या प्रवासी जहाजावर भाषण देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सर डेव्हिड यांनी आपल्या कारकिर्दीत विनोदी स्वरूपाचे लेखनही केले. त्याव्यतिरिक्त छोटय़ा पडद्यावरील ‘फ्रोस्ट यांच्यासोबत न्याहरी’ हा त्यांचा कार्यक्रम भारतातही प्रसारित होत होता. डेव्हिड यांनी चित्रपटनिर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:03 am

Web Title: famous british journalist david frost pass away
Next Stories
1 सीरियातील बदलत्या परिस्थितीसाठी इस्रायल सज्ज
2 नेल्सन मंडेला घरी
3 बालगुन्हेगारास ३ वर्षांची शिक्षा
Just Now!
X