दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये एका महिलेला आत्महत्येचं नाटक करणं चांगलंच महागात पडलं. महिलेने आत्महत्येची धमकी दिल्याने तिच्या पतीनेच आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे.
पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरुन वाद झाला होता, त्याचं रुपांतर भांडणात झालं. त्यानंतर पत्नीने आपल्या खोलीचा दरवाजा बंद करुन घेतला आणि काही कपड्यांना आग लावून आत्महत्येसाठी आग लावली आहे असं भासवण्याचा तिने प्रयत्न केला. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेमुळे पती भेदरला आणि त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन गळफास लावून घेत आत्महत्या केली. फरीदाबादच्या भारत कॉलनीमध्ये ही घटना घडली. मृत पतीच्या पित्याने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पत्नीवर आत्महत्येसाठी दबाव टाकल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, अशी माहिती घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी कर्मवीर सिंह यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2018 8:30 am