23 January 2021

News Flash

कृषी कायद्यांवरुन विरोधक भ्रम पसरवत आहेत-मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसीतल्या सभेत विरोधकांवर टीका

फोटो - एएनआय

कृषी कायद्यांवरुन भ्रम पसरवण्याचं काम सुरु आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला आहे. वाराणसीत झालेल्या सभेत ते बोलत होते. आधी असं होत असे की जर केंद्र सरकारने एखादा निर्णय घेतला आणि तो जर मान्य नसेल तर त्याचा विरोध दर्शवला जात असे. मात्र आता निर्णयाला विरोध दर्शवयाचा नाही आणि भ्रम, अफवा पसरवण्याचं काम मात्र नेटाने करायचं हे विरोधक करत आहेत. एखाद्या चांगल्या निर्णयाबाबत अकारण अपप्रचार करायचा. शेतकऱ्यांचा पुळका आला आहे असं दाखवणाऱ्या लोकांनी गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांना छळलं आहे असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसतील्या सभेत केला आहे.

केंद्र सरकारने आणलेले कायदे हे शेतकऱ्यांचं बळ वाढवणारे आहेत. मोठ्या बाजारांपेठांची दारं खुली करणारे आहेत. मात्र विरोधक ही बाब समजून न घेता या कायद्यांमुळे कसे दुष्परिणाम होत आहेत हा भ्रम अकारण पसरवत आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

भारतातली कृषी उत्पादनं सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत. मग शेतकऱ्याने त्याची उत्पादनं मोठ्या बाजारपेठेत आणि जास्त किंमतींपर्यंत पोहचवायची नाहीत का? जर कुणाला असं वाटत असेल की याआधीच सुरु असलेली पद्धतच योग्य आहे तर त्यासाठी त्याला कुणी अडवलं आहे? आधी बाजारपेठांच्या बाहेर सुरु असणारे व्यवहार हे बेकायदेशीर होते. त्यावेळी छोट्या शेतकऱ्यांना हातोहात फसवलं जात असे. मात्र आता छोटा शेतकरीही अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी करु शकतो. या मध्ये गैर काय आहे असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 4:21 pm

Web Title: farmer being empowerd by giving them options for bigger market says pm narendra modi scj 81
टॅग Narendra Modi
Next Stories
1 शेतकरी आंदोलनावर मुख्यमंत्री नितीश कुमारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
2 करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
3 अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन कुत्र्यासोबत खेळताना पाय घसरुन पडले आणि….
Just Now!
X