13 December 2017

News Flash

व्ही. के. सिंग यांचे आत्मकथन, वाजपेयी-मोदींची चरित्रे, धारावीचा मागोवा

अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांची चरित्रे आणि सध्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात उतरलेले निवृत्त लष्करप्रमुख

वृत्तसंस्था, नवी दिल्ली | Updated: January 18, 2013 1:56 AM

अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्यांची चरित्रे आणि सध्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात उतरलेले निवृत्त लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांच्या आत्मकथनापासून खुशवंत सिंग यांच्यासारख्या लेखकांच्या खुमासदार ललित साहित्यापर्यंतची पुस्तके देशातील इंग्रजी ग्रंथप्रेमींच्या भेटीला या वर्षभरात येत आहेत.
रूपा प्रकाशनासाठी ‘द गुड, द बॅड अ‍ॅण्ड द रिडिक्यूलस’ हे पुस्तक खुशवंत सिंग हुमरा कुरेशी यांच्यासह लिहिणार आहेतच शिवाय ‘खुशवंतनामा : द लेसन्स ऑफ माय लाइफ’ हे त्यांचे पुस्तक पेंग्विनतर्फे प्रकाशित होणार आहे.
पॅन मॅक् मिलनचे भारतातील प्रकाशनप्रमुख सौगता मुखर्जी यांनी सांगितले की, यंदा आम्ही वैचारिक आणि ललित पुस्तके सारख्याच संख्येने काढणार आहोत. त्यात जयंत कृपलानी यांचे ‘न्यू मार्केट टेल्स’, आमना फॉन्टानेल्ला खान यांचे ‘द पिंक सारी रिव्होल्यूशन’, निर्मला सीतारामन यांचे ‘अटलबिहारी वाजपेयी : अ पोलिटिकल बायोग्राफी’ ही पुस्तके उल्लेखनीय आहेत.
हार्पर कॉलिन्सतर्फे विजय अमृतराज यांचे ‘लर्निग टू सव्‍‌र्ह’, ग्यानप्रकाश यांचे ‘बॉम्बे व्हॅल्वेट’, जोसेफ कॅम्पाना यांचे ‘धारावी’, तर एन. के. सिंग आणि निकोलस स्टर्न यांचे ‘द न्यू बिहार :अ‍ॅन अनयुजवल स्टोरी ऑफ गव्हर्नन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’, व्ही. रघुनाथन यांचे ‘लॉक्स, महाभारत अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स’ ही पुस्तकेही वेगळ्या विषयांचा वेध घेणारी आहेत.
पेंग्विनतर्फे पाकिस्तान आणि बांगला देशातील लेखकांचीही पुस्तके येत आहेत. ‘हाऊ टू गेट फिल्दि रिच इन रायझिंग आशिया’ हे मोहसिन हमीद यांचे पुस्तक आणि प्रख्यात दिग्दर्शिका मीरा नायर यांचे ‘द रिलक्टन्ट फंडामेंटालिस्ट : फ्रॉम बुक टू फिल्म’ हे पुस्तक वाचकांचे लक्ष वेधून घेईल.
 बांगला देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीतील अनिश्चिततेने झाकोळलेल्या दिवसांचा वेध घेणार ‘द ब्लॅक कॅट’ हे नीआमत इमाम याचे पुस्तक आगळेवेगळे ठरण्याची अपेक्षा आहे.गुलझार (हाफ अ रूपी), सुनील गंगोपाध्याय  (निवडक संग्रह), अमित चौधुरी (कॅलकॅटा : टू इयर्स इन द सिटी), हबीब तन्वर (मेमॉयर्स) आणि करिष्मा कपूर (माय यम्मी मम्मी गाईड) ही पुस्तकेही पेंग्विनतर्फे प्रकाशित होत आहेत.
ऋतिक रोशनचा व्यक्तिगत व्यायाम प्रशिक्षक क्रिस गेथिन याचे व्यायामाबद्दलचे पुस्तक सायमन अँड शस्टर इंडिया कंपनी काढणार आहे. आल्फ संस्था ही बरखा दत्त, जन. व्ही. के. सिंग आणि वाल्मिक थापर यांची पुस्तके प्रकाशित करणार आहे. प्रणय गुप्ते यांचे ‘द डायनेस्टी : द नेहरूज अ‍ॅण्ड द गांधीज’, सांदिपन देब यांचे ‘द राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ रजत गुप्ता’ आणि गीतकार प्रसून जोशी यांचे स्वतच्या गीताबद्दलचे ‘द पोएट स्पीक्स’ ही पुस्तकेही याच संस्थेतर्फे येत आहेत. रॅण्डम हाऊस ‘इन डिफरन्ट फॉर्म’ हे युवराज सिंग याचे पुस्तक प्रकाशित करणार आहे.
दहाव्या वर्षांत पदार्पण करणारी जुबान ही प्रकाशनसंस्था आपली दहा सर्वात गाजलेली पुस्तके नव्या रूपात काढणार आहे. जयपूर फेस्टिव्हलच्या सुमारासही तीन नवी पुस्तके जुबान काढणार आहे. त्यांचे सर्वात लक्षवेधी पुस्तक म्हणजे ‘द ब्रॉन्झ स्वोर्ड ऑफ तेंगपाखरी तहसिलदार’ ही इंदिरा गोस्वामी यांची अखेरची कादंबरी! ब्रिटिश भारतातील पहिली महिला महसूल अधिकारी असलेल्या एका बोडो स्वातंत्र्यसैनिक महिलेची ही कथा आहे. मूळ आसामीवरून ती अनुवादित होत आहे.
दृष्टिक्षेपात काय?
विजय अमृतराज यांचे ‘लर्निग टू सव्‍‌र्ह’, ग्यानप्रकाश यांचे ‘बॉम्बे व्हॅल्वेट’, जोसेफ कॅम्पाना यांचे ‘धारावी’, तर एन. के. सिंग आणि निकोलस स्टर्न यांचे ‘द न्यू बिहार :अ‍ॅन अनयुजवल स्टोरी ऑफ गव्हर्नन्स अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’, व्ही. रघुनाथन यांचे ‘लॉक्स, महाभारत अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स

First Published on January 18, 2013 1:56 am

Web Title: farmer indian army chief v k singh autobiography
टॅग V K Singh