News Flash

राहुल गांधी गर्भश्रीमंत, मी शेतकऱ्याच्या घरात जन्मलोय; राजनाथ सिंहाचा पलटवार

कृषी कायद्यांवरील टीकेला दिलं प्रत्युत्तर

संग्रहित छायाचित्र

एकीकडे शेतकरी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे, तर दुसरीकडे राजकीय खडाजंगी जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांवर खलिस्तानी व नक्षलावादी असल्याचा आरोप करण्यात आला होता. या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला होता. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पलटवार केला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी प्रत्युतर दिलं.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी आणि नक्षलवादी असल्याचा तथाकथित आरोप करण्यात आला होता. त्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. त्याचबरोबर हे सरकार दोन तीन उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता.

आणखी वाचा- “भारताच्या अंतर्गत मुद्यांवर बोलणं बंद करा, भारताला कुणाच्याही हस्तक्षेपाची गरज नाही”

राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. राहुल गांधी माझ्यापेक्षा लहान आहेत आणि शेतीबद्दल मला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. कारण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या पंतप्रधानांनीही एका गरीब महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मला इतकंच सांगायचं आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही,” असं राजनाथ सिंह म्हणाले.

आणखी वाचा- तोडगा निघणार, शेतकरी घरी परतणार?; आजच्या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा

आंदोलन करणारे शेतकरी नक्षलवादी आणि खलिस्तानी असल्याचा आरोपावर राजनाथ सिंह म्हणाले,”शेतकऱ्यांविरुद्ध कुणीही असे आरोप करायला नको. शेतकऱ्यांविषयी आमच्या मनात असलेला आदर आम्ही व्यक्त करतो. आम्ही मान झूकवून शेतकऱ्यांना नमन करतो. ते आपले अन्नदाते आहेत,” असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 10:33 am

Web Title: farmer protest update rahul gandhi born rich i am a farmers son bmh 90
Next Stories
1 देशात मागील २४ तासांत २६ हजार ५७२ जण करोनामुक्त, २० हजार ५५० नवे करोनाबाधित
2 “भारताच्या अंतर्गत मुद्यांवर बोलणं बंद करा, भारताला कुणाच्याही हस्तक्षेपाची गरज नाही”
3 भारत-चीन सीमा वादावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही – संरक्षणमंत्री
Just Now!
X