06 March 2021

News Flash

२०२४ पर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी; आंदोलक शेतकऱ्यांचा मोदी सरकारला इशारा

मोदी सरकारचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपत आहे

दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन दीड महिन्यानंतरही सुरु आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी सुरु असणाऱ्या या आंदोलनामध्ये गुरुवारी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यानंतर आता शेतकऱ्यांनी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेड काढण्याची तयारी सुरु केली आहे. इतकचं नाही तर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही दिल्लीच्या सीमांवर २०२४ पर्यंत म्हणजेच दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत तयार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी २०१९ साली दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर त्यांचा कार्यकाळ २०२४ ला संपणार आहे. दरम्यान हा इशारा गुरुवारी देण्यात आला असला तरी आजच्या चर्चेच्या आठव्या फेरीमध्येही काहीच निष्पण्ण झालं नसून सरकार आणि शेतकरी आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्याने चर्चेमधून काहीच साध्य झालं नाही.

नक्की पाहा >> शेतकरी आंदोलनात होणाऱ्या विरोधानंतर रिलायन्सने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

गुरुवारी भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश तिकैत यांनी सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही टॅक्टर रॅली काढल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. २६ जानेवारीला आम्ही ट्रॅक्टर परेड काढणार आहोत असंही टिकैत यांनी स्पष्ट केलं. पुढे बोलताना त्यांनी २०२४ पर्यंत आंदोलन करण्याची आमची तयारी आहे असंही सांगितलं आहे. याशिवाय जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी २६ जानेवारी रोजी रॅलीचे आयोजन करण्याचा उल्लेख केला आहे. ट्रॅक्टर रॅली ही सिंघू बॉर्डरवर २६ जानेवारी रोजी निघाणाऱ्या रॅलीचा ट्रेलर असल्याचं यादव म्हणाले.

नक्की वाचा >> पंतप्रधान मोदींनी लोकांना विचारला हा इंट्रेस्टींग प्रश्न; तुम्हाला ठाऊक आहे का उत्तर?

अडीच हजार ट्रॅक्टर रस्त्यावर

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाल्याचे पहायला मिळालं. पोलिसांच्या अंदाजानुसार गुरुवारी अडीच हजार ट्रॅक्टर या आंदोलनामध्ये सहभागी झाले. सोमवारी शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेची सातवी फेरी पार पडली होती. त्यामध्येही कोणताच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला होता. या ट्रॅक्टर रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला.

नक्की वाचा >> “मोदी कोणीची चौकीदारी करतात?, अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?”

आजच्या बैठकीमध्ये काय झालं?

शेतकरी आणि आंदोलकांमध्ये पार पडलेल्या आजच्या बैठकीमध्येही दोन्ही पक्षांनी आपलं म्हणणं लावून धरल्याने काहीच ठोस तोडगा न निघताच बैठक संपली. बैठकीत केंद्रीय नेत्यांनी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवे कायदे हे संपूर्ण देशासाठी असून फक्त पंजाब आणि हरियाणापुरते मर्यादित नसल्याचं सांगितलं. दुसरीकडे शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम असून राज्यांना आपला कायदा आणू द्यावा अशी मागणी केली.

नक्की पाहा >> मोदी सरकारच्या काळात अदानींच्या २१ कंपन्यांना मंजूरी; जाणून घ्या Adani Agri Logistics आहे तरी काय?

शेतकरी नेत्यांनी काय म्हटलं

“बैठकीत अत्यंत जोरदार चर्चा झाली. कायदे रद्द करा त्याशिवाय काही नको असं आम्ही स्पष्ट सांगितलं. आम्ही कोणत्याही कोर्टात जाणार नाही. कायदे रद्द करा अन्यथा आम्ही लढा सुरु ठेवू. २६ जानेवारीला आम्ही ठरलं आहे त्याप्रमाणे आंदोलन करु,” असं अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान यांनी म्हटलं आहे. आजच्या बैठकीनंतर शेतकरी नेते तिकैत यांनी सांगितलं की, “जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोवर आम्ही माघार घेणार नाही. सरकारला नवीन दुरुस्ती केल्या आहेत त्याबद्दल चर्चा करायची आहे. पण आम्हाला चर्चेत कोणतीही अट नको आहे. कायदे रद्द व्हावेत इतकीच मागणी आहे.”

नक्की वाचा >> “शेतकऱ्यांनाही मोदी, शाह यांच्यासारखे मध्यस्थ नकोय ते थेट अंबानी, अदानींशी बोलतील”

कृषीमंत्र्यांनी काय सांगितलं

“चर्चा करण्यात आली पण कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारने शेतकरी संघटनांना कायदे रद्द करण्याऐवजी दुसरा पर्याय द्या विचार करु असं सांगितलं. पण आमच्यासमोर कोणताही पर्याय मांडण्यात आला नाही. यामुळे बैठक संपवण्यात आली आणि १५ तारखेला पुन्हा बैठकीचा निर्णय घेण्यात आला,” अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. अनेक संघटनांचा या नव्या कायद्यांना पाठिंबा असल्याचंही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 6:46 pm

Web Title: farmer protest we are ready to fight till 2024 says farmer leader scsg 91
Next Stories
1 शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेदरम्यान खडाजंगी; बैठकीनंतर आरोप-प्रत्यारोप
2 “…तरच आमची घरवापसी”; शेतकरी नेत्यांनी मोदी सरकारला पुन्हा एकदा ठणकावलं
3 “मोदी आणि ट्रम्प यांच्या दोस्तीचे दुष्परिणाम आता भारताला भोगावे लागणार”
Just Now!
X