12 December 2017

News Flash

कर्जबाजारी शेतक-याची पंजाबमध्ये आत्महत्या

सधन व कृषिप्रधान असलेल्या पंजाब राज्यातील मोगा येथे एका कर्जबाजारी शेतक ऱ्याने आत्महत्या केली.

मोगा, पंजाब, पीटीआय | Updated: December 11, 2012 5:00 AM

सधन व कृषिप्रधान असलेल्या पंजाब राज्यातील मोगा येथे एका कर्जबाजारी शेतक ऱ्याने आत्महत्या केली. त्याने घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दोन कमिशन एजंटनी त्याच्यावर दबाव आणला होता. जसविंदर सिंग असे या  शेतक ऱ्यांचे नाव असून तो नूरपूर हकिमा खेडय़ातील रहिवासी आहे. या शेतक ऱ्याचा चुलतभाऊ जीत सिंग याने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. या शेतक ऱ्याने कमिशन एजंट सतविंदर कुमार व प्रेमचंद यांच्याकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मृत शेतक ऱ्याने काही रक्कम या कमिशन एजंटांना परतही केली होती पण तरी ते त्याच्यावर सर्व रक्कम व्याजासह परतफेड करण्यासाठी दबाव आणीत होते. दोन कमिशन एजंटवर गुन्हा दाखल केला आहे पण ते अटक टाळत आहेत असे पोलिसांनी सांगितले.

First Published on December 11, 2012 5:00 am

Web Title: farmer suicide in punjab
टॅग Farmer Suicide