प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्या. दिल्लीत घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच लाठी चार्ज केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या.

कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने बॅरिकेडस मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या. प्रत्युत्तर म्हणून आंदोलक त्यांच्या तलवारी काढून पोलिसांच्या दिशेने पळाले.

तलवारी बाहेर काढणाऱ्या आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी पोलिस अश्रूधुराच्या नळकांडया फोडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. गाझीपूर सीमेजवळ शाहदरा येथे ट्रॅक्टरनी बॅरिकेडस मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दिल्ली-नोएडा बॉर्डरवर स्टंट करत असताना एक ट्रॅक्टर पलटी झाला. त्यात दोन शेतकरी होते.