प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या सीमेवर काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आता बजेटच्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय किसान युनियनचे बलबिरसिंग राजेवाल म्हणाले, “प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारानंतर आता १ फेब्रुवारी रोजी संसदेवर काढण्यात येणारा शेतकऱ्यांचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आंदोलनांतर्गत शहीद दिनी आम्ही देशभरात मोर्चे काढणार आहोत. आम्ही एक दिवसाचा उपवासही करणार आहोत.”

सरकारच्या कट कारस्थानामुळे ट्रॅक्टर परेड फेल गेली. यामध्ये अडथळे आणण्याचे सरकारने प्रयत्न केले. यामध्ये ९९.९० टक्के लोक हे शांततेत आंदोलन करत होते. मात्र, काही चुकीच्या घटना घडल्या. सरकारने आमच्यासमोर अनेक अडथळे निर्माण केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असेही राजेवाल यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers cancel march to parliament on budget day aau
First published on: 27-01-2021 at 22:17 IST