News Flash

बटाटय़ाचे दर निम्म्यावर; उत्पादनखर्चही निघेना

विश्लेषकांच्या मते बटाटय़ाचे जे दर अन्न प्रक्रिया मंत्रालयाने दिले आहेत

 नवी दिल्ली : बटाटा उत्पादक व ग्राहक राज्यांत बटाटय़ाचे भाव पन्नास टक्क्य़ांनी कोसळले असून रब्बी हंगामात त्याचे दर किलोला ५ ते ६ रुपये किलोपर्यंत खाली आले, असे सरकारी आकडेवारीवरून दिसून येते. ग्राहकांना बटाटे मिळत असले तरी त्यांचे दर  खूपच कमी आहेत. शेतक ऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही.

विश्लेषकांच्या मते बटाटय़ाचे जे दर अन्न प्रक्रिया मंत्रालयाने दिले आहेत, ते घाऊक पातळीवर साठपैकी २५ बटाटा उत्पादक राज्यांत पन्नास टक्के घटले आहेत. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार या राज्यांचा समावेश होतो. हे दर वीस मार्चपर्यंतचे आहेत. २० मार्चला उत्तर प्रदेशातील संबळ व गुजरातमधील दिशा येथील घाऊक बाजारात गेल्या तीन वर्षांतील नीचांकी दर गाठला गेला. बटाटय़ाचे भाव तिथे सहा रुपये किलो नोंदले गेले. वर्षभरापूर्वी बटाटय़ाचे घाऊक बाजारातील किमान दर हे उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्य़ात ८-९ रुपये किलो होते तर इतर राज्यात ते १० रु. किलो होते. घाऊक मंडईत ते २३ रुपये किलो होते. बटाटा ग्राहक राज्यांत २० मार्चला घाऊक दर पन्नास टक्के कमी झाले. गेल्या वर्षी १५ पैकी १२ ग्राहक राज्यांत हे दर घसरले.

पंजाबमध्ये अमृतसर व दिल्लीत २० मार्चला बटाटय़ाचे दर पाच रुपये किलो होते. जास्तीत जास्त भाव चेन्नईत सतरा रुपये होता. ग्राहक कामकाज मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे २० मार्चला किरकोळ किंमत १० रु. किलो होती तर वर्षभरापूर्वी ती वीस रुपये किलो होती. यंदा दिल्लीत बटाटय़ाचे दर २० मार्चला किरकोळ  बाजारात पंधरा रुपये किलो होते तर गेल्या वर्षी ते ३० रुपये किलो होते.

ग्राहक कामकाज सचिव लीना नंदन यांनी सांगितले की, या वर्षी बटाटय़ाचे पीक चांगले आले.

बटाटय़ाचे ८५-९० टक्के उत्पादन हे हिवाळ्यात (रब्बी हंगामात) होते. त्यातील ६०-७० टक्के साठा हा शीतगृहांकडे जातो.

उर्वरित वर्षांत हा बटाटा वापरला जातो. नंतर पुन्हा नोव्हेंबरमध्ये हंगाम सुरू होतो. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब व गुजरात ही बटाटय़ाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत.

* भारतातील एकूण बटाटा   उत्पादन – वार्षिक ५  कोटी टन

* लागवडीखालील सरासरी क्षेत्र -२१ लाख हेक्टर

* हेक्टरी सरासरी उत्पादन-      २२  ते २४ टन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 1:19 am

Web Title: farmers suffer after potato prices fall by half zws 70
Next Stories
1 गोळीबारात ८ आशियाई व्यक्तींचा मृत्यू; अमेरिकेत निषेध मोर्चे
2 ममतांना पराभव दिसू लागला – मोदी
3 मी गाढव! अधिकारी कुटुंबाला ओळखले नाही- ममता
Just Now!
X