News Flash

दिल्लीत शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष

नवे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.

तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.

आठवडय़ाभरातील चर्चेच्या पाच फेऱ्यांनंतर दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी दिली असली तरी या मोर्चामध्ये घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू होईल. या ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीच्या सीमांवरील सर्व अडथळे काढले जातील. त्यानिमित्ताने गेले दोन महिने दिल्लीच्या वेशींवर आंदोलन करणारे शेतकरी दिल्लीत प्रवेश करतील, अशी माहिती स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.

Live Blog
19:27 (IST)26 Jan 2021
नांग्लोईत परिस्थिती हाताबाहेर; आंदोलकांचा पोलीस व्हॅनवर हल्ला

दिल्लीतील हिंसाचारादरम्यान नांग्लोई येथील परिस्थिती हाताबाहेर गेली असून आंदोलकांना पोलीस व्हॅनचा ताबा घेत त्यावर चढले तसेच एकाला लाठीने मारहाण केली.

19:22 (IST)26 Jan 2021
हरयाणा पोलीस हायअलर्टवर, डीजीपींचे एसपींना आदेश

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या काही हिंसाचाराच्या घटनांनंतर हरयाणा पोलिसांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हरयाणाचे डीजीपी मनोज यादव यांनी सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे.

16:45 (IST)26 Jan 2021
अमित शाहची अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गृहमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. गरज पडली, तर तैनातीसाठी अतिरिक्त तुकडया सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 

16:38 (IST)26 Jan 2021
शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा: दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलना दरम्यान मंगळवारी दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मागच्या दोन महिन्यापासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. वाचा सविस्तर बातमी.

15:49 (IST)26 Jan 2021
आंदोलक शेतकऱ्यांना लाल किल्ल्याच्या परिसरातून हटवलं.

पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना लाल किल्ल्याच्या परिसरातून हटवलं. सौम्य लाठीचार्जही केला. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन, दिल्लीच्या काही भागांमध्ये इंटनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. 

15:24 (IST)26 Jan 2021
दिल्ली : हिंसाचार घडलेल्या काही भागात इंटरनेट सेवा स्थगित

दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान ज्या भागात हिंसाचार घडला तिथल्या काही भागात इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे.

15:20 (IST)26 Jan 2021
दिल्ली : नांगलोई भागात पोलिसांनी फोडल्या अश्रूधुरांच्या नळकांड्या

दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यान नांगलोई भागात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या.

15:08 (IST)26 Jan 2021
"दिल्लीतील ट्रॅक्टर परेडदरम्यानच्या हिंसाचाराला भाजपाचे पोलिसचं जबाबदार"

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचाराला भाजपाचे पोलिसचं जबाबदार असल्याचा आरोप शेतकरी नेते अशोक ढवळे यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी हिंसा केलेली नाही, जी काही हिंसा झाली ती पोलिसांनी केली आहे. ती सुद्धा भाजपाच्या सरकारच्या सांगण्यावरुन झालेली आहे, असंही ढवळे यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्त वाचा

15:05 (IST)26 Jan 2021
कुणी तलवारी उपसल्या तर कुणी बसगाड्या फोडल्या… शेतकरी आंदोलनाचे मन सुन्न करणारे PHOTOS

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज आंदोलन  करणाऱ्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. दिल्लीत झालेल्य हिंसाचाराचे मन सून्न करणारे PHOTOS

14:52 (IST)26 Jan 2021
दिल्ली : शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात फडकावला शेतकरी संघटनेचा झेंडा

राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलक आक्रमक झाले असून लाल किल्ल्यावर त्यांनी प्रवेश केला आहे. तसेच किल्ल्यासमोर या आंदोलकांनी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकावला.

14:40 (IST)26 Jan 2021
आंदोलक लाल किल्ल्यात दाखल

शेतकरी आंदोलक लाल किल्ल्यात दाखल झाले असून तिरंगा फडकावला आहे. 

14:38 (IST)26 Jan 2021
शेतकऱ्याच्या मृत्यूची चौकशी सुरु

दिल्ली-हरियाणा सिघू बॉर्डरवर एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सोनपतमधील मदीना गावातील राजेश यांचा मृत्यू झाला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

14:36 (IST)26 Jan 2021
ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू

दिल्लीमधील डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर उलटून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. 

14:34 (IST)26 Jan 2021
…अन् संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकलेल्या ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्यासाठी तो एकटा धावला

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी आज दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला असून या आंदोलनाला हिंसेचं गालबोट लागलं आहे. पोलिसांनी परवानगी दिलेली असतानाही शेतकरी दुसऱ्या मार्गाने दिल्लीत प्रवेश करत असल्याने अनेक ठिकाणी संघर्ष पहायला मिळाला. पोलीस त्या मार्गाने जाऊ देत नसल्याचा दावा शेतकरी करत आहेत. त्यातच काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्याने परिस्थिती चिघळली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी

14:31 (IST)26 Jan 2021
"हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही"; राहुल गांधींचं शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला असून ठिकठिकाणी आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. सविस्तर बातमी वाचा

14:27 (IST)26 Jan 2021
आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर फडकवला झेंडा 

कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीमारही करावा लागला. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे. 

14:11 (IST)26 Jan 2021
…आणि प्रत्युत्तर म्हणून आंदोलक शेतकरी तलवारी काढून पोलिसांच्या दिशेने पळाले

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्या. दिल्लीत घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच लाठी चार्ज केला. वाचा सविस्तर बातमी.

14:06 (IST)26 Jan 2021
लाल किल्ल्यावर शेतकरी

दिल्लीत शेतकरी आंदोलक झाले आक्रमक, थेट लाल किल्ल्यात पोहोचले.

13:49 (IST)26 Jan 2021
शेतकरी आंदोलकाकडून पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकान वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र असून तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं चित्रही पहायला मिळालं.

13:19 (IST)26 Jan 2021
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं

दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. 

13:17 (IST)26 Jan 2021
दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे दरवाजे बंद

आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. 

13:16 (IST)26 Jan 2021
आंदोलनकर्त्याने केली पोलिसाची सुटका

पोलिसांसोबत संघर्ष निर्माण झाला असतानाच संतप्त आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासाठी काही आंदोलक धावून आले. त्यांनी त्याची सुखरुपपणे सुटका केली.  

13:10 (IST)26 Jan 2021
दिल्लीत आंदोलकांकडून बसेसची तोडफोड

दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी आयटीओ परिसरात बसेसची तोडफोड केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला आहे. 

13:02 (IST)26 Jan 2021
"दिल्लीत प्रवेश केलेले लोक आमचे नाहीत"

दिल्लीत प्रवेश केलेले लोक आमचे नसल्याचं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे. एकीकडे बॉर्डरवर अनेक ठिकाणी आंदोलक आक्रमक झाले असताना दुसरीकडे काही शेतकरी रिंग रोडच्या रस्त्याने दिल्लीत दाखल झाले आहेत. 

12:45 (IST)26 Jan 2021
आंदोलकांनी तलवार काढल्याने परिस्थिती चिघळली

दिल्लीमध्ये आंदोलकांनी पोलिसांसमोर तलवारी बाहेर काढल्याने परिस्थिती चिघळली आहे. 

12:29 (IST)26 Jan 2021
आंदोलक प्रगती मैदानावर पोहोचले

गाझीपूर बॉर्डवरुन आंदोलक प्रगती मैदानात पोहोचले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी रिंग रोड येथून दिल्लीत प्रवेश केला आहे. 

12:27 (IST)26 Jan 2021
पोलिसांनी बॅरिकेड्स हटवल्याने परिस्थिती नियंत्रणात

सशस्त्र पोलिसांनी बॉर्डरवरुन माघार घेतली असून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे, यामुळे सध्या तणाव कमी झाला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

12:21 (IST)26 Jan 2021
गाझीपूर बॉर्डरवर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्यानंतर शेतकऱ्यांची झालेली धावपळ

PTI Photo

12:17 (IST)26 Jan 2021
आंदोलकांनी कर्नाल बायपास येथील बॅरिकेड्स तोडले

आंदोलकांनी दिल्लीत प्रवेश कऱण्यासाठी कर्नाल बायपास येथील बॅरिकेड्स तोडले आहेत. #WATCH Protestors at Karnal bypass break police barricading to enter Delhi as farmers tractor rally is underway in the national capital#FarmLaws pic.twitter.com/pzfJs6Ioef— ANI (@ANI) January 26, 2021

12:15 (IST)26 Jan 2021
शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांकडून बंदुका हिसकावल्या, बसेसची तोडफोड

दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं आहे. दिल्लीच्या मुकरबा चौक येथे पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. वाचा सविस्तर बातमी

12:12 (IST)26 Jan 2021
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर

दिल्लीमधील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला. 

12:09 (IST)26 Jan 2021
दिल्लीच्या तिकरी बॉर्डरवर जमा झालेले शेतकरी
12:09 (IST)26 Jan 2021
दिल्लीच्या तिकरी बॉर्डरवर जमा झालेले शेतकरी
12:08 (IST)26 Jan 2021
शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी बॅरिकेड्स का तोडत आहेत?

किसान मजदूर संघर्ष समितीचे सतनाम सिंग यांनी दिल्ली पोलीस शेतकऱ्यांना रिंग रोड येथून पुढे जाऊ देत नसल्याचा दावा केला आहे. ज्या मार्गावरुन जाण्याची परवानगी होती तिथे अडवलं जात असल्याचं सतनाम सिंग यांनी म्हटलं आहे. 

11:50 (IST)26 Jan 2021
सिंघू बॉर्डरवर आंदोलकांना पोलिसांनाच मागे ढकललं
11:46 (IST)26 Jan 2021
शेतकऱ्यांना परवानगी मिळालेल्या मार्गाचा वापर करण्याची पोलिसांची विनंती

शेतकरी पोलिसांनी परवानगी दिलेल्या मार्गाचा वापर करत नसल्याने तणाव निर्माण झाला आहे. सिंघू बॉर्डरवर असणारे सहपोलीस आयुक्त एस एस यादव यांनी शेतकऱ्यांना परवानगी मिळाली आहे त्याच मार्गाचा वापर करावा अशी विनंती केली आहे. 

11:38 (IST)26 Jan 2021
दिल्लीमधील नाट्यमय घडामोडी

दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आक्रमक झाले असून संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे पोलिसांच्या वाहनावरच चढले आहेत. 

11:31 (IST)26 Jan 2021
दिल्लीच्या सीमेवर तणाव...
11:31 (IST)26 Jan 2021
पोलिसांकडून ड्रोनचा वापर

फरिदाबाद - पालवाल बॉर्डरवर सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला असून सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. 

11:29 (IST)26 Jan 2021
गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले, पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर

गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले असून तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या दिशेने अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या आहेत. 

11:26 (IST)26 Jan 2021
गाझीपूर बॉर्डरवर संघर्ष

दिल्लीतील गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोहोचल्यानंतर संघर्ष पहायला मिळाला.

11:25 (IST)26 Jan 2021
दिल्ली पोलीस म्हणतात....

दिल्ली पोलिसांनी आपण उत्तर प्रदेश पोलीस आणि काही शेतकरी नेत्यांच्या संपर्कात असल्याचं गाझीपूर बॉर्डरवर तैनात पूर्व दिल्लीच्या डीसीपींनी माहिती दिली आहे. तसंच ड्रोनच्या माध्यमातून ट्रॅक्टर मोर्चावर नजर ठेवली जात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. 

11:17 (IST)26 Jan 2021
पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले

दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळाली आहे.

Next Stories
1 करोडपती उद्योजकाच्या मुलाने फक्त ३० हजारांसाठी केली ६५ वर्षीय व्यक्तीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
2 लालू प्रसाद यादव यांच्या सुटकेसाठी तेजप्रताप यांचे ‘आझादी पत्र’ अभियान
3 ‘देवाच्या मनात असेल तर मी…’; राम रहीमची आई व अनुयायांना चिठ्ठी
Just Now!
X