भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकमेकांच्या ताब्यातील काश्मीरचा भूभाग कधीच मिळवता येणार नाही, असे मत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले.  भारताच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग आपल्याला कधीच मिळवता येणार नाही, हे पाकिस्तानी लष्कराने ध्यानात घेतले पाहिजे, मात्र, त्याचवेळी भारतालाही पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा प्रदेश परत मिळवता येणार नाही, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे, असे फारूख अब्दुल्ला यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही देशांनी सीमप्रश्नासंबंधी काहीतरी मार्ग काढला पाहिजे. दोन्ही देश शांततेने नांदू शकतील असा कार्यक्षम तोडगा काढणे गरजेचे असल्याचे मत फारूख अब्दुल्लांनी व्यक्त केले.