सलग दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी राष्ट्रगीत सुरू असताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला मोबाईलवर बोलत होते. हा सगळा प्रकार घटनास्थळी असलेल्या कॅमेऱ्यांमध्ये टिपला गेला आहे. राष्ट्रगीत सुरू असल्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते शांतपणे उभे असताना फारूख अब्दुल्ला उभे राहून आपल्या मोबाईलवरून कोणाशी तरी बोलते होते. ‘एएनआय’ने याचा व्हिडिओ ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.