07 March 2021

News Flash

खेळता-खेळता वडील अंगावर पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

लहान मुलांशी खेळताना खबरदारी घ्यावी.

वडील आपल्या चिमुकल्यासह शॉपिंग करण्यासाठी सुपरमार्केटमध्ये आले होते.

चीनमध्ये घडलेल्या एका दुर्देवी घटनेत चिमुकल्याशी खेळतांना वडीलच त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. सुपरमार्केटमध्ये खरेदीदरम्यान वडील आपल्या चिमुकल्यासोबत खेळत असताना ही घटना घडल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे. अचानक वडील मुलाच्या अंगावर पडल्याने मुलाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.
एक व्यक्ती आपल्या छोट्या मुलासोबत हात धरून चालत असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये पाहायला मिळते. मुलाच्या पुढे चालणाऱ्या वडिलांचे देन्ही हात मागे असून मुलाने वडिलांचे दोन्ही हात मागून पकडले आहेत. अशा अवस्थेत चालणाऱ्या या दोघांचा थेड्याच वेळात तोल जातो. तोल गेल्याने वडील मुलाच्या अंगावर पडतात. एक महिला कर्मचारी त्यांना मदत करतानादेखील दिसते. चीनच्या गुआंगजाओ ब्रॉडकास्टिंग नेटवर्कने हा व्हिडिओ टेलिव्हिजनवर प्रसारित केला. त्यानंतर तो युट्यूबवर अपलोड करण्यात आला. कालांतराने हे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. आपल्या नातेवाईकांनी या घटनेतून शिकून लहान मुलांशी खेळताना खबरदारी घ्यावी या इच्छेपोटी चीनी नागरीक हा व्हिडिओ आपले नातेवाईक आणि ओळखीच्यांबरोबर शेअर करत आहेत.
एका महिलेच्या मदतीने त्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले परंतु मान तुटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे या संदर्भातील काही वृत्तामध्ये म्हटले आहे. वडीलांचे पूर्ण वजन मुलाच्या डोक्यावर आणि मानेवर पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 6:58 pm

Web Title: father accidentally kills his son when falls on him
Next Stories
1 ‘आप’च्या २७ आमदारांचे सदत्यत्व धोक्यात
2 संरक्षणमंत्री बोलत नाही तर कृती करतात – मोदी
3 बहिष्काराच्या आवाहनानंतरही चिनी मालाची विक्री भारी
Just Now!
X