वडिल आणि मुलाच्या नात्यामध्ये जन्मापासूनच आपुलकी, जिव्हाळा असतो. वयानुसार ते नाते मित्रत्वामध्ये बदलते. कुठल्याही मुलाचा आपल्या वडिलांवर प्रचंड विश्वास असतो. लग्न जुळवण्यासारख्या नाजूक विषयामध्ये तर, मुल आपल्या वडिलांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. वडिल आपले कधीही वाईट चिंतणार नाहीत अशी त्यांची ठाम भावना असते. पण तामिळनाडूतील नागपट्टिणम जिल्ह्यातील वेदारण्यममध्ये मात्र पिता याला अपवाद ठरला आहे. त्याने आपल्याचा मुलाचा विश्वासघात केला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

जबरदस्तीने गळयात बांधले मंगळसूत्र
आरोपी वेदारण्यमजवळच्या सेम्बोदाइचा निवासी आहे. त्याचे त्या भागामध्ये गारमेंटचे दुकान आहे. आरोपीचा मुलगा आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. कॉलेजमध्ये असताना त्याचे एका मुलीसोबत प्रेम जुळले. दोघांनाही लग्न करायचे होते. सध्या दोघेही क्रीडा साहित्य विकणाऱ्या एका दुकानात काम करतात.

वडिलांना जेव्हा मुलाच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजले. तेव्हा त्याचा या नात्याला विरोध होता. त्यांनी दोघांना विभक्त करण्याचा कट रचला. त्यांनी मुलीशी संपर्क साधला व लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलीला सेम्बोदाइ येथे बोलावले.
मुलगी विश्वास ठेऊन मुलाच्या वडिलांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी गेली. त्यावेळी आरोपीने तिचा मोबाइल फोन हिसकावून घेतला. जबरदस्तीने तिच्या गळयात मंगळसूत्र बांधले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने दोन दिवस मुलीला घरात कोंडून ठेवले व तिच्यावर बलात्कार केला.

मुलाला याबद्दल कळल्यानंतर तो मंगळवारी रात्री सेम्बोदाइ येथील घरी आला व त्याने मुलीची सुटका केली. त्यानंतर दोघांनी वेदारण्यम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.