कन्सास येथील एका महिलेला बुधवारी ठरल्याप्रमाणे मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. या महिलेने मिसुरीत एका गर्भवती महिलेचा गळा आवळून तिचे पोट फाडून गर्भाशयातील बाळालाही कापून टाकले होते. गेल्या सात दशकांत अमेरिकेमध्ये महिला कैद्यास प्रथमच मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
लिसा माँटगोमेरी (वय ५२) हिला पहाटे १.३१ वाजता मृत घोषित करण्यात आले. प्राणघातक इंजेक्शन देऊन तिच्या मृत्युदंडाची अंमलबजावणी टेरे हॉट येथील कारागृह संकुलात करण्यात आली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मृत्युदंडाच्या शिक्षेचे समर्थक असून त्यांनी मृत्युदंडाच्या अंमलबजावणीची पद्धत १७ वर्षांनंतर परत अमलात आणली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 12:11 am