स्त्रियांसाठी लैंगिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या व्हायग्रा गोळीस अमेरिकेतील संघराज्य सल्लागार मंडळाने मान्यता दिली आहे. स्त्रियांमध्ये लैंगिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या एकाही औषधाला आतापर्यंत मान्यता नव्हती. पुरूषांसाठी मात्र व्हायग्राच्या गोळीला खूप आधी मान्यता देण्यात आली होती. महिला संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून हे लैंगिक समानतेच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे म्हटले आहे.
‘फ्लिबानसेरिन’ नावाने महिलांसाठीची व्हायग्रा गोळी तयार करण्यात आली आहे. या गोळीचा उपचारासाठी वापर करताना त्याचे इतर परिणाम डॉक्टरांनी सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे रक्तदाब कमी होतो, गरगरल्यासारखे होते, मळमळते. विशेष पात्रता असलेल्या डॉक्टरांनीच हे औषध देणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाने पुरूषांसाठी व्हायग्राला मान्यता दिली होती, पण स्त्रियांना मात्र काहीच पर्याय नव्हता. आता स्प्राऊट फार्मास्युटिकल्सने तयार केलेल्या फ्लिबानसेरिन या गोळीला मान्यता दिली आहे. यापूर्वी दोनदा प्रशासनाने ही गोळी नाकारली होती. आता सल्लागार मंडळाच्या निर्णयानंतर ही गोळी मंजूर करण्याचा अंतिम निर्णय १८ ऑगस्टला घेतला जाईल. ‘इव्हन द स्कोअर कोअ‍ॅलिशन’ या संस्थेच्या अध्यक्षा सुसान स्कानलान यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Thailand House of Representatives approves same sex marriage
समलैंगिक विवाहाला आता थायलंडमध्येही मान्यता… हा प्रवास आव्हानात्मक कसा ठरला?
US statement despite India objection that the legal process should be fair and transparent
‘कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक असावी’ ; भारताच्या आक्षेपानंतरही अमेरिकेचे वक्तव्य
us clear stand on gaza ceasefire
गाझातील शस्त्रविरामासाठी अमेरिकेची स्पष्ट भूमिका; नकाराधिकाराचा वापर टाळल्याने यूएनएससीमध्ये ठराव मंजूर, नेतान्याहूंचा अमेरिका दौरा रद्द