News Flash

शेतकरी आंदोलनामुळे काही गावं करोना हॉटस्पॉट झालीयत; मुख्यमंत्री खट्टर यांचा आरोप

राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावाही खट्टर यांनी केलाय

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: एएनआय आणि पीटीआय)

देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागलाय. एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे दिल्लीच्या टिकरी आणि सिंघू या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यावरुनच आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आंदोलकांवर निशाणा साधला आहे. या आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरयाणामधील काही गावं करोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप खट्टर यांनी केलाय.

खट्टर यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्ला दिल्याचा उल्लेख केलाय. “महिन्याभरापूर्वी मी शेतकरी नेत्यांना आवाहन केलं होतं की करोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मागे घ्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल, असं मी म्हटलं होतं. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावं की करोनाचा हॉस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये जा करत असल्याने हे घडलं आहे,” असं खट्टर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ जणांना करोनाची लागण

राज्यातील करोनाबाधितांचा आकडा कमी होत असल्याचेही खट्टर यांनी म्हटलं आहे. “राज्यात मागील तीन दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आज एक लाख सात हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या जेवढी गरज आहे त्यासाठी पुरेशी आहे,” असं खट्टर म्हणाले.

आणखी वाचा- “फक्त नरेंद्र मोदींमुळेच लशींचा तुटवडा, ते लोकांशी खोटं बोलताहेत”

एकीकडे खट्टर यांनी शेतकरी आंदोलनामुळे गावं हॉटस्पॉट होत असल्याचं म्हटलं असलं तरी दुसरीकडे आंदोलक शेतकऱ्यांनीही करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत तयारी केल्याचं दिसत आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना वारंवार करोना नियमांचं पालन कऱण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, त्यासोबतच ऑक्सिजन सिलेंडर्स, कॉन्सन्ट्रेटर्स यांचीही सोय करण्यात आलेली आहे. मास्क, स्वच्छता, सुरक्षित अंतर अशा नियमांचं पालन कऱण्याबाबत वारंवार सूचना केल्या जात असल्याचं या आंदोलनात सहभागी झालेल्या बलजीत कौर सांगतात. टिकरी सीमेवरचे एका शेतकरी नेत्याने, “आमचे नेते आम्हाला आता अधिक लोक आंदोलनासाठी न आणण्याचे आवाहन करत आहे. कारण करोनाची ही लाट प्राणघातक ठरत आहे. याआधी आंदोलनात ५०००० हून अधिक लोक सहभागी झाले होते. मात्र, आता ९ ते १० हजारांच्या वर ही संख्या जाऊ नये यासाठी आवाहन केलं जात आहे,” अशी माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 8:55 am

Web Title: few villages become hotspot due to farmers protest says haryana cm ml khattar scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Israel Palestine Conflict: इस्रायलच्या विमानतळावर रॉकेट हल्ला केल्याचा हमासचा दावा
2 “फक्त नरेंद्र मोदींमुळेच लशींचा तुटवडा, ते लोकांशी खोटं बोलताहेत”
3 Covid: “…तर मास्क घालण्याची गरज नाही,” अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची मोठी घोषणा
Just Now!
X