28 February 2021

News Flash

सिगारेट उधार देण्यास नकार दिल्याने तरुणाची हत्या

पोलिसांनी आरोपींना अटक केली असून तपास करत आहेत

राजधानी दिल्लीमधील नजफगढ परिसरात बीडीचं पाकिट उधारीवर देण्यास नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाचे नातेवाईक आहेत.

ही घटना नजफगढ परिसरातील झुग्गी लाल स्टेडिअमजवळ घडली आहे. येथे प्रेम नावाच्या एका महिलेचं दुकान आहे. गुरुवारी महिला आपल्या दुकानावर असताना कुणाल आणि राहुल हे दोघे तरुण तिथे पोहोचले आणि उधारीवर बीडीचं पाकिट मागू लागले. महिलेने आधीचं उधार जोपर्यंत फेडत नाही तोपर्यंत काही देणार नाही सांगत त्यांना नकार दिला.

यावरुन महिला आणि तरुणांमध्ये भांडण सुरु झालं. भांडण एवढं वाढलं की आरोपी महिलेला शिवीगाळ करु लागले. इतक्यात महिलेचा मुलगा गौरव याने तिथे येऊन तरुणांचा विरोध करण्यास सुरुवात केली. यावेळी रागाच्या भरात कुणाल आणि राहुलने गौरववर चाकूने वार केला. यानंतर दोघांनीही तेथून पळ काढला. गौरवला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2018 7:04 am

Web Title: fight over cigaratte cause murder in delhi
Next Stories
1 एकाच व्यक्तीकडून गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण – सूत्र
2 श्रीलंकेत सिगारेट विक्रीवर बहिष्कार
3 माझ्याविरोधात महाभियोग चालवल्यास अर्थव्यवस्था कोलमडेल, सगळे गरिब होतील – डोनाल्ड ट्रम्प
Just Now!
X