जम्मू-काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये खोट्या बातम्या (फेक न्यूज)पसरवल्या जात असल्याचा दावा वारंवार सरकारी यंत्रणांकडून करण्यात आला होता. अशाच एका प्रकरणामध्ये जेएनयूमध्ये शिकणारी काश्मीरी विद्यार्थीनी आणि जम्मू-काश्मीर पिपल्स मुव्हमेंट या राजकीय पक्षाची सदस्य शेहला रशीद हिच्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणावर सैन्यही तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारविरोधात गैरसमज निर्माण होईल अशा फेक न्यूज पसरवल्याप्रकरणी शेहला रशीद विरोधात सुप्रीम कोर्टातील वकील अलख अलोक श्रीवास्तव यांनी फौजदारी तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी तिच्या अटकेचीही मागणी केली आहे.