News Flash

पुढच्या १० वर्षांचा विचार करुन अर्थसंकल्प मांडला – निर्मला सीतारमन

पुढच्या दहा वर्षांचा विचार करुन हा अर्थसंकल्प मांडला असून स्टार्टअप कंपन्यांना कर सवलतीचा पुरेपूर फायदा दिला आहे.

पुढच्या दहा वर्षांचा विचार करुन हा अर्थसंकल्प मांडला असून स्टार्टअप कंपन्यांना कर सवलतीचा पुरेपूर फायदा दिला आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सांगितले. एकूणच अर्थव्यवस्थेच्या विकासावर भर देण्यात आला आहे.

ग्रामीण भागात नवे उपक्रम सुरु झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्याचवेळी शहरी राहणीमान उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे निर्मला सीतारमन म्हणाल्या.

वित्तीय कंपन्याही बँकिंग व्यवस्थेच्या मुख्य घटक आहे. वित्त पुरवठा करणाऱ्या या वित्तीय कंपन्यांबाबतही सरकारने सर्वसमावेश भूमिका घेतली आहे असे सीतारमन म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 3:42 pm

Web Title: finance minister nirmala sitharaman budget 2019 next ten years dmp 82
Next Stories
1 राजीव गांधी हत्या प्रकरण: नलिनीला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर
2 बायकोवर अनैतिक संबंधांचा संशय, नवऱ्याने संपवलं कुटुंब
3 ‘नारी तू नारायणी’ हे जर देशाने लक्षात घेतलं तर महिलांविरोधातली हिंसा थांबेल
Just Now!
X