‘फायनान्शियल एक्स्प्रेस’चे व्यवस्थापैकीय संपादक सुनील जैन यांचे शनिवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. सुनील जैन यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये दाखल करण्यात आले होते. ते त्यातून सावरत असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.