कोळसा घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज दोन कंपन्यांवर बनावट कागदपत्रांचा वापर व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असून दिल्ली व हैदराबाद येथील सोळा ठिकाणी छापे टाकले आहेत. सीबीआयने इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅंड स्टील कंपनीच्या विरोधात बनावट कागदपत्रांचा वापर व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.  सीबीआयने हे गुन्हे दाखल केल्यानंतर या कंपन्यांच्या हैदराबाद, सतना, सिकंदराबाद, जयपूर, विशाखापट्टनम, रूरकेला व दिल्ली येथील कार्यालयांवर छापे टाकले. या कंपन्यांनी कोळसा खाणी मिळवण्यासाठी पात्रता सिद्ध करण्याकरिता उलाढालीचे खोटे आकडे दाखवले होते. २००६-०९ या काळातील कोळसा खाण वाटपाच्यावेळची ही प्रकरणे असून त्यात सीबीआयने अगोदर सात एफआयआर दाखल केलेले आहेत.