News Flash

योगगुरू रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल! डॉक्टरांविषयीचं वक्तव्य भोवलं!

योगगुरू रामदेव बाबांविरोधात छत्तीसगडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून IMA नं त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

संग्रहीत छायाचित्र (सौजन्य : ट्वीटर)

देशातील डॉक्टरांकडून करोनावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथी औषधांवर टीका करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातला अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रामदेव बाबांवर जीवघेणे आजार पसरवण्याची कृती करणे, शांतता भंग करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. IMA (Indian Medical Association) च्या छत्तीसगड विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांकडून वापरण्यात येणाऱ्या अॅलोपथीच्या औषधांविषयी खोटी माहिती पसरवण्याचा आरोप रामदेव बाबांवर करण्यात आला आहे. त्यासंदर्भातली तक्रार आयएमएनं केल्यानंतर त्यांच्यावर भादंवि कलम १८८, कलम २६९ आणि कलम ५०४ अनुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक अजय यादव यांनी ही माहिती दिली आहे.

योगगुरु रामदेव यांचं शीर्षासन!; करोनावरील लस घेणार असल्याचं केलं स्पष्ट

तक्रारीमध्ये व्हायरल व्हिडीओंचाही उल्लेख

यासंदर्भात आयएमएच्या हॉस्पिटल बोर्डचे संचालक आणि रायपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. राकेश गुप्ता आणि विकास अगरवाल यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षभरापासून योगगुरू रामदेवबाबा चुकीची माहिती पसरवत आहेत. त्याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल झालेली त्यांची धमकीवजा विधानं, वैद्यकीय क्षेत्र, आयसीएमआर आणि इतर फ्रंटलाईन संघटनांबाबतची मांडलेली भूमिका यावर तक्रारीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. उपचारांविषयी गैरसमज पसरवणारे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं देखील या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

रामदेवबाबा अशिक्षित व्यक्ती – डॉ. आढाव

ज्या काळात डॉक्टर, पॅरामेडिक कर्मचारी, सरकार आणि प्रशासन एकत्रपणे करोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यावेली रामदेवबाबा सर्वमान्य उपचार पद्धतींवर आक्षेप घेऊन त्याविषयी गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 8:10 pm

Web Title: fir against yog guru ramdev baba on chhattigarh raipur ima complaint pmw 88
Next Stories
1 बिहारमध्ये उलटे फासे! बंडखोरी करणारे पशुपतीकुमार पारसच बनले पक्षाध्यक्ष!
2 “बंदी आणण्याची इच्छा नाही, पण नियम पाळावेच लागतील”, रवीशंकर प्रसाद यांचा ट्विटरला इशारा!
3 “केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही, म्हणून..”, ममता बॅनर्जींनी साधला निशाणा!
Just Now!
X