काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासंदर्भात योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेले वक्तव्य आता त्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींचे लग्न न झाल्यामुळे ते दलितांच्या घरी हनिमून आणि पिकनिकसाठी जातात असे वक्तव्य करून रामदेव बाबा यांनी खळबळ उडवून दिली होती. /या आक्षेपार्ह विधानची पोलिसांनी दखल घेतली असून  बाबा रामदेव यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. या वक्तव्यानंतर रामदेव यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच रामदेव बाबांचे मत दलित विरोधी असल्याची टीका काँग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंह यांनी केली होती.
राहुल दलितांच्या घरी हनिमून आणि पिकनिकसाठी जातात. राहुलची आई त्यांना सांगते, तु परदेशी मुलीबरोबर लग्न केले तर तु नक्की पंतप्रधान होशील. राहुलने भारतीय मुलीबरोबर लग्न करावे, असे त्यांना वाटत नाही.” असे विधान रामदेव बाबा यांनी लखनौ येथील प्रचारसभेत केले होते. या वक्तव्यानंतर काही दलित कार्यकर्त्यांनी रामदेव यांच्या विरोधात निवडणूक आयोग व राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केली होती.