25 January 2021

News Flash

दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलच्या आगीत १७ जणांचा मृत्यू

दिल्ली करोलबागमधील अर्पित हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती

दिल्लीत करोलबागमधील अर्पित  पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या समयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली.

आता ही आग विझवण्यात आली आहे. चार तास चाललेल्या बचाव मोहिमे दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी ५० जणांची सुटका केली. दोन जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जणांना रुग्णालयात आणले त्यावेळी मृत घोषित करण्यात आले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २६ गाडया लगेच घटनास्थळी रवाना झाल्या. सकाळी ७.३० च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आठ वाजल्यापासून कुलिंग ऑपरेशन सुरु झाले.

अर्पित पॅलेस या तीन मजली हॉटेलमधील सर्वच्या सर्व ३५ रुम बुक होत्या. नेमकी आग कशामुळे लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहाटेच्यासमयी सर्वजण गाढ झोपेत असताना ही घटना घडली. त्यामुळे अनेकांना प्राण वाचवण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत बहुतांश मृत्यू गुदमरल्यामळे झाले आहेत.

घाबरल्यामुळे दोघांनी इमारतीवरुन उडया मारल्या असे मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागल्याचे समजताच हॉटेलमध्ये एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्या जेणेकरुन धूर बाहेर जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 7:52 am

Web Title: fire at delhi karolbagh arpit palace hotel 9 deaths
Next Stories
1 राम मंदिरासाठी 17 फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच, शंकराचार्य सरस्वतींची घोषणा
2 शिवसेनेला मोठेपणा हवा! शहा -उद्धव यांच्यात चर्चा
3 राफेलप्रकरणी राहुल गांधींची तोफ : अंबानींसाठी मोदींनीच दार उघडले 
Just Now!
X