17 January 2021

News Flash

कोलकात्यात रुग्णालयाला आग, २५० जणांना काढले बाहेर

कोलकाता येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आग भडकली असून अग्निशमन दलाच्या १० गाडया आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत.

कोलकाता येथील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आग भडकली असून अग्निशमन दलाच्या १० गाडया आग विझवण्यासाठी दाखल झाल्या आहेत. या आगीत अद्यापपर्यंत तरी जिवीतहानी झालेली नाही. आतापर्यंत रुग्णांसह २५० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णालयातील औषधांच्या दुकानात सकाळी ७.५८ च्या सुमारास ही आग भडकली.

या आगीचा धूर संपूर्ण रुग्णालयाच्या इमारतीत पसरल्यानंतर काही रुग्णांनी जीव वाचवण्यासाठी खिडकीमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. बचाव पथकांनी काही रुग्णांना सलायनसह बाहेर काढण्यात आले. सध्या रुग्ण रुग्णालयाबाहेर रस्त्यावर झोपले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून नेमके किती नुकसान झालेय ते समजू शकलेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2018 9:58 am

Web Title: fire at kolkata medical collage hospital
Next Stories
1 रुपयाचा ऐतिहासिक तळ, डॉलरमागे ७३ ची वेस ओलांडली
2 मॉर्निंग बुलेटिन: पाच महत्त्वाच्या बातम्या
3 अमेरिकेचा विरोध झुगारुन भारत उद्या रशिया बरोबर एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करार करणार ?
Just Now!
X