News Flash

संसद भवन परिसरातील आगीवर नियंत्रण

संसद भवन परिसरात भीषण आग लागल्याचे वृत्त असून आगीची तीव्रता वाढतचं जात असल्याचे कळते.

| March 22, 2015 02:41 am

राजधानी दिल्लीतील संसद परिसरात लागलेल्या भीषण आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले.
राजधानी दिल्लीतील संसद परिसरात असलेल्या स्वागत कक्षाजवळील वातानुकू लन यंत्रणेला आज दुपारी भीषण आग लागली होती. सुटीचा दिवस असल्याने परिसरात फारशी गर्दी नव्हती. कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. संसदेच्या गेट नंबर ५ जवळील एसी प्लँटजवळ आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  सुट्टीचा दिवस असल्याने संसदेत सुरक्षा रक्षकांशिवाय अन्य कर्मचारी उपस्थित नव्हते. आगीत संसदेच्या कागदपत्रही सुरक्षित असल्याचे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:41 am

Web Title: fire at parliament area
Next Stories
1 बीएमडब्ल्यु, फरारी आणि लॅम्बोर्गिनी ट्रॅफिकमध्ये फसतात तेव्हा…
2 उत्तरप्रदेशमध्ये रेल्वे अपघातात ३४ ठार
3 काळा पैसा रोखणारे विधेयक लोकसभेत सादर
Just Now!
X