28 September 2020

News Flash

कोविड रुग्णालय आग : पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी पुढे केला मदतीचा हात

मुख्यमंत्री रूपाणी यांनी दिले चौकशीचे आदेश

गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळानंतरही ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेची दखल घेत शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीमधून २ लाखांची मदत जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रैय रुग्णायातील आगीच्या घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून २ लाखांची मदत जाहीर केली आहेत. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनीदेखील या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) संगीता सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आलं आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीचं कारण आद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार नवरंपुऱ्यातील कोविड डेडिकेटेड श्रेय रुग्णालयात पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. या रुग्णालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली. सध्या आगीचं कारणं स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 10:13 am

Web Title: fire at shrey hospital in ahmedabad pm narendra modi announces ex gratia of rs 2 lakhs each jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Good News: ऑक्सफर्ड पाठोपाठ नोव्हाव्हॅक्सने सिरमसोबत केला लस पुरवठ्याचा करार
2 मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे नवे उपराज्यपाल
3 चीन : वुहानमधून समोर आली धक्कादायक बातमी; करोनामुक्त झालेल्या ९० टक्के रुग्णांच्या फुफ्फुसावर गंभीर परिणाम
Just Now!
X