तेलंगण येथील श्रीशैलम धरणावरील किनाऱ्यावर असणाऱ्या भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. या आगीमुळे पॉवर प्लांटच्या युनिट चारमध्ये स्फोट झाले. गुरुवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

आग लागली तेव्हा पॉवर स्टेशनमध्ये २५ कर्मचारी उपस्थित होते. तेलंगण राज्य वीज निर्मिती महामंडळाचे कर्मचारी काम करत होते. आतापर्यंत १० जणांची सुटका करण्यात आली असून आठ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. हे धरण कृष्णा नदीवर स्थित असून आंध्र प्रदेश आणि तेलंणगला विभाजित करतं.

या भूमिगत पॉवर प्लांटमध्ये सहा पॉवर जनरेटर आहेत. चौथ्या पॅनेलमध्ये ही आग लागली. आग लागल्यानंतर तिथे उपस्थितर अधिकाऱ्यांनी विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग विझवण्यात त्यांना यश मिळालं नाही.

आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. त्यासोबतच वीज गेल्यानेही अडथळा निर्माण होत होता. राज्य सरकारने यानंतर बचावकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली.