दिल्ली येथील अखिल भारतीा आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) एका ऑपरेशन थिएटरला आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच अग्निशामक दलाचया ६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सर्व रूग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दिल्लीतील अग्निशामक विभागाने सांगितले की, ट्रॉमा सेंटरच्या तळमजल्यावर आग लागली. तेथून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ही आग आज (रविवार) सांयकाळी ट्रॉमा सेंटरच्या एका ऑपरेशन थिएटरला आग लागली. ज्या इमारतीला आग लागली होती. तिथे मोठ्याप्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशामक दलाच्या गाड्यांकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

एम्समध्ये उपचारासाठी देशभरातील विविध भागातून हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात.