गुजरातमधल्या सुरतच्या तक्षशिला इमारतीला आग लागून आत्तापर्यंत एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे असेही समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीला  या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. काहीजण या इमारतीत अडकलेही आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.

मृतांच्या कुटुंबीयांना गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच संबंधित घटना का घडली? इमारतीत आग नियंत्रण करणारी यंत्रणा नव्हती का? याबाबत सविस्तर चौकशीचेही आदेश दिले आहेत.मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच रूग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली.

 

तक्षशिला इमारतीत बरीच शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते. सध्या आग नियंत्रणात आणण्याचे काम आणि मदत व बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या आणि दुसऱ्या मजल्यावरून मुलांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना दुःख सहन करण्याची ताकद देव देवो आणि जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.