आंध्र प्रदेशतील अनंतपूरम जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास बंगळुरु-नांदेड एक्स्प्रेसच्या वातानुकुलित बोगीला लागलेल्या भीषण आगीत २६ जणांचा मृत्यू झाला. तर, १२ प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी धर्मावरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या डब्यामध्ये जवळपास ६२ प्रवासी होते.  मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असून, मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शॉर्ट सर्कीटमुळे किंवा ज्वालाग्राही साहित्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तिविण्य़ात येत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेले हेल्पलाईन नंबर-
रेल्वे फायर हेल्पलाइन क्रमांक:  ०८०२२३५४१०८, ०८०२२२५९२७१, ९७३१६६६८६३
बंगळुरु हेल्पलाइन क्रमांक: ०८०२२२५९२७१, ०८०-२२१५६५५४
हैदराबाद हेल्पलाइन क्रमांक: ०४०- २३३१०६८०
पुत्तापर्थी हेल्पलाइन क्रमांक: ०८५५५२८०१२५