News Flash

सौदी अरेबियातील रुग्णालयात आग, २५ जणांचा होरपळून मृत्यू

सौदीतील नागरी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली

दक्षिण सौदी अरेबियातील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत होरपळून २५ जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जण जखमी झाला आहेत. सौदीतील नागरी संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली.
दक्षिण सौदीतील जाझन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये आगीचा भडका उडाला. या विभागाशेजारीत प्रसुती विभाग असल्यामुळे तिथेही लगेचेच आगीचे लोण पसरले. रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. पण यामध्येच २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीत जखमी झालेल्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरी संरक्षण विभागाने केलेल्या ट्विटमध्ये आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले असून, परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे म्हटले आहे. आग लागण्याचे कारण शोधण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 12:36 pm

Web Title: fire in saudi hospital 25 dead
टॅग : Fire
Next Stories
1 रेल्वेच्या तात्काळ शुल्कात ३३ टक्क्यांपर्यंत वाढ, प्रवाशांना फटका
2 अपघातांत केवळ जवानच कसे मरतात?
3 खासदारांचे वेतन दुप्पट?
Just Now!
X