लाहोरमध्ये इमारतीला आग लागून एक ते बारा वयोगटातील सहा भावंडे होरपळून ठार झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शहरातील शाह बाग भागातील एका दोन मजली इमारतीमधील एसीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यामुळे काही क्षणांतच आगीने संपूर्ण इमारतीला घेरले. या वेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. मात्र बचाव कार्यास उशीर झाल्याने सहाही बालकांना वाचविण्यात अपयश आले.