News Flash

स्वातंत्र्यदिनानिमित्त अग्नी सेवा, होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदकांची घोषणा

स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी ५९ कर्मचाऱ्यांना अग्नी सेवा पदकं जाहीर झाली आहेत. यांपैकी एकाला राष्ट्रपती अग्नीसेवा शौर्य पदक, तिघांना अग्नीसेवा शोर्य पदक, पाच जणांना विशिष्ट सेवेसाठी

होमगार्ड (संग्रहित छायाचित्र)

स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षी ५९ कर्मचाऱ्यांना अग्नी सेवा पदकं जाहीर झाली आहेत. यांपैकी एकाला राष्ट्रपती अग्नीसेवा शौर्य पदक, तिघांना अग्नीसेवा शोर्य पदक, पाच जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्नीसेवा पदक आणि ५० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी अग्नीसेवा पदक जाहीर झाले आहेत.

यांपैकी ५५ कर्मचाऱ्यांना होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदके जाहीर झाली आहेत. यांपैकी पाच कर्मचाऱ्यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर ५० कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदकं जाहीर झाले आहेत.

त्याचबरोबर सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सशस्त्र दल आणि निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांसाठी १३१ शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली. यात एक किर्ती चक्र, २० शौर्य चक्रे, सेना पदकांना तीन बार (शौर्य), ९३ सेना पदके (शौर्य), ११ नौसेना पदके (शौर्य) आणि ३ वायुसेना पदके (शौर्य) यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 4:10 am

Web Title: fire service home guard and civil defense medals announced for independence day
Next Stories
1 ९४२ पोलीस कर्मचारी आणि ३६ तुरुंगाधिकाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर
2 आशुतोष यांचाही आम आदमी पार्टीला रामराम; राजकारणातूनही घेणार संन्यास?
3 स्वातंत्र्यदिनी आदिवासींच्या कलावस्तूंना उत्तेजन
Just Now!
X