News Flash

मनोरुग्णालयातील आगीत २३ जणांचा करूण अंत

दक्षिण रशियातील एका मनोरुग्णालयास आग लागून २३ जण ठार झाले आहेत

| December 14, 2015 12:33 am

दक्षिण रशियातील एका मनोरुग्णालयास आग लागून २३ जण ठार झाले आहेत, असे देशाच्या आपत्कालीन सुविधा मंत्रालयाने सांगितले.
रुग्णालयाची इमारत लाकडाची होती व ती आगीत भस्मसात झाली. यात एकूण २० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर अलफेरोवका खेडय़ातील या रुग्णालयात आग लागली.
हे ठिकाण दक्षिण रशियातील वोरोनेझ भागात आहे. किमान ४४० अग्निशमन जवानांनी ८० वाहनांसह घटनास्थळी जाऊन आग विझवली. आगीचे कारण लगेच समजू शकले नाही. सोविएत काळातील मनोरोग उपचार केंद्रात लागलेली ही आग वेगाने पसरत गेली.
या भागात घरांनाही नेहमी आगी लागत असतात. त्यामुळे येथील अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

याधीही दुर्घटना
सप्टेंबर २०१३ मध्ये वायव्य रशियात मनोरुग्णांच्या एका उपचार व निवारा केंद्रात आग लागून ३७ दण ठार झाले होते, तर त्याच वर्षी एप्रिलमध्ये लागलेल्या एका आगीत ३८ जण ठार झाले होते. २००९ मध्ये पेर्म या शहरात एका नाइटक्लबला आग लागून १५६ जण मृत्युमुखी पडले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:33 am

Web Title: fire took place in mental hospital
टॅग : Mental Hospital
Next Stories
1 ‘आयसिस’च्या समर्थनार्थ घोषणा देणारे चौघे अटकेत
2 झोपडपट्टी हटविताना चिमुरड्याचा मृत्यू; केजरीवालांनी तीन अधिका-यांना केले निलंबित
3 मंत्र्याच्या पतीचा चावा घेतल्याने ईस्राईल पंतप्रधानांच्या कुत्र्याला अटक
Just Now!
X