18 October 2019

News Flash

कॅनडात टोरांटोमध्ये हॉटेलबाहेर गोळीबार, दोघांचा मृत्यू

कॅनडात टोरांटो येथे एका हॉटेल बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची माहिती टोरांटोचे पोलीस अधिकारी ग्लेन रसेल यांनी दिली.

प्रतिकात्मक छायाचित्र

कॅनडातील टोरांटो शहरात एका हॉटेल बाहेर हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमीमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. रविवारी रात्री १० च्या सुमारास ही  घटना घडली. गोळीबार करणारा हल्लेखोरही ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची माहिती टोरांटोचे पोलीस अधिकारी ग्लेन रसेल यांनी दिली. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण दहा जणांना वेगवेगळया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अशी माहिती टोरांटोच्या पॅरामेडीक सेवेने दिली आहे.

हल्लेखोराने जवळपास २० गोळया झाडल्या असे घटनास्थळी उभ्या असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अचानक गोळीबार झाल्यामुळे एकच अफरातफरी निर्माण झाली. प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळत होता असे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. चार जण या गोळीबारात जखमी झाल्याचे मी पाहिले असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

First Published on July 23, 2018 9:19 am

Web Title: firing at canada toronto
टॅग Firing