News Flash

अमेरिका: वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू

जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फोटो सौजन्य : ट्विटर

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील माध्यमांकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. तर या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

एबीसी समुहाशी निगडीत WJLA-TV ने ट्विटरवरून गोळीबारात जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असल्याची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. शहरातील कोलंबिया स्ट्रीटवर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, या घटनेत 6 जणांना गोळ्या लागल्या असल्याची माहिती अमेरिकेतील स्थानिक वाहिनी FOX-5 ने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 9:36 am

Web Title: firing in washington dc america some injured dead police on spot jud 87
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पुन्हा तोंडघशी
3 किशोरवयीन पर्यावरण कार्यकर्तीचा लढा अमेरिकी काँग्रेसमध्ये
Just Now!
X